इतके निर्लज्ज राजकारणी महाराष्ट्राच्या विधानसभेत कधीच बसले नव्हते.
हा मूर्खपणाचाच नवे तर निर्लज्जपणाचा कळस आहे.
************************************************************************************************************
पहिल्यांदा एक आमदार गाडी वेगाने चालवल्याबद्दल पकडला जातो. मग तो (नेहमीप्रमाणेच) पोलिसांना शिवीगाळ करतो . प्रकरण वाढते.
आमदार जागृत असतात. त्यांना अपमान सहनच होत नाही. मग ते थेट विधान सभेचा 'हक्कभंग' दाखल करतात. त्या राज्याचे गृहमंत्री अतिशय कर्तव्यदक्ष आणि गुन्हेगारांना सोलून काढणारे वगैरे असतात. म्हणून तत्काळ त्या अधिकाऱ्याला दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठवले जाते.
माननीय आमदार नुकतेच दबंग सिनेमा पाहून आलेले असतात. म्हणून कायद्याने शिक्षा वगेरे क्षुल्लक गोष्टीवर विश्वास ठेवण्याची त्यांना गरज वाटत नहि. मग ते थेट त्या अधिकारयालाच बेदम मारहाण करतात.
मग भलताच गोंधळ होतो म्हणून शेवटी त्या कर्तव्यदक्ष आमदारांना निलंबित केले जाते . (काय हा मूर्खपणा! कोण मुर्ख लोक बिचाऱ्या आमदारांवर कारवाई करू शकतात ?)
असो. कधी कधी कायद्याच्या चौकटीत निरपराधी लोकही भरडले जातात. काय करणार, लोकशाही आहे ना!!!!!
पण विधान सभा अतिशय नैतिक आणि लोकशाही मानणाऱ्या लोकांनी भरलेली असते . मग त्या बिचाऱ्या आमदारांना तुरुंगाची हवा खायला लावणाऱ्या दोन क्रूर आणि खलनायकी संपादकांवार 'हक्क भंग' ठराव आणून तो मंजूर केला जातो. बरं झालं . हे संपादक स्वतःला समजतात तरी काय? अरे हे दोन क्षुद्र लोक निवडणुकीला उभे राहिले तर यांना पाच मते तरी मिळतील का? (नारायण राणे साहेब शब्द चोरले. माफ करा. मला तुमच्या कोणत्याही हक्काचा कसलाही भंग करायचा नाहीये. कृपया मला तुरुंगात टाकू नका).
************************************************************************************************************
म्हणजे सगळ्या भारतातला नालायकपणा एकत्र केला तरीही तो कमी पडेल अश्या प्रकारच वर्तण आज महाराष्ट्र विधान सभेमध्ये काही लोकांनी केल आहे. लोकशाही, कायद्याच राज्य या सगळ्या संकल्पनांचा पार चुरा करून त्या फुंकून खाल्ल्या आहेत या लोकांनी. लाजा कश्या वाटत नाहीत तोंड वर करून त्या पवित्र सभागृहात बसायला.
खरंच बरं झालं आज यशवंतराव जिवंत नहित. त्यांना हे बघवलच गेल नसतं
विनोद तावडे परवा ओरडून सांगत होते कि राग मलापण आलाय. आता काय तो राग खुंटीला टांगून ठेवला?
आणि माझा सगळ्या राजकीय पक्षांना प्रश्न आहे। तुम्ही अजून या पराक्रमी आमदारांना निलंबित का केलेल नाही? राज ठाकरेंची प्रकृती इतकी अस्वस्थ आहे कि अजून राम कदम यांच्यावर काही कारवाई त्यांनी केली नाही? आणि भाजप चे काय? माफ करा. भाजप म्हणजे Party With Difference आहे ना....
सर्व महाराष्ट्राला काळिमा फासणारा हा प्रकार आहे.
त्याची जेवढी करावी तितकी निंदा कमीच आहे. आणि तशीही मुख्यमंत्र्यांनी घोर निंदा केलेली आहेच. म्हणून आपण ती करायची काही गरज नहिये.
असो!!!!!!!
Bible says that "Evil prevails when good men fail to act". we can see that now.
Bible says that "Evil prevails when good men fail to act". we can see that now.